जाणून घ्या भारतीय बॅडमिंटन स्टार पीवी सिंधुला

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (14:59 IST)
ऑलिंपिकच्या बॅडमिंटनमध्ये सेमीफायनल मॅच जिंकून ऑलिंपिकमध्ये किमान रौप्य पदक निश्चित करणारी पीवी सिंधूने देशवासींच्या मनात पूर्णपणे घर केले आहे. देशाला उमेद आहे की ती शुक्रवारी संध्याकाळी होणार्‍या फायनल सामन्यात जगातील नंबर एक महिला बॅडमिंटन खेळाडू स्पेनची कॅरोलिना मारिनचा पराभव करून देशासाठी सुवर्ण पदक नक्कीच मिळवेल. आज आम्ही तुम्हाला पीवी सिंधूशी निगडित काही खास गोष्टी सांगत आहोत ...  
 
पुसरला वेंकटा सिंधू (पीवी सिंधू)चा जन्म 5 जुलै 1995 रोजी झाला होता. पीवी सिंधूचे आई वडील दोन्ही व्यावसायिक व्हॉलीबॉल खेळाडू राहिले आहे. सिंधूचे वडील पीवी रमन्ना यांना व्हॉलीबॉलसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.  
 
सिंधूने वयाच्या 7-8 वर्षापासूनच बॅडमिंटन खेळणे सुरू केले होते. मुलीची आवड बघून तिचे वडील ट्रेनिंगसाठी रोज घरापासून 30 किलोमीटर दूर गाचीबौली घेऊन जात होते.
पीवी सिंधू हैदराबादमध्ये गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेते आणि त्यांना 'ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट' नावाची एक नॉन-प्रॉफिट संस्था सपोर्ट करते.  
 
सिंधूला या जागेपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी बॅडमिंटन खेळाडू पुलेला गोपीचंदचा मौल्यवान योगदान आहे. सिंधू जेव्हा 9 वर्षाची होती, तेव्हापासून गोपीचंद तिला ट्रेनिंग देत आहे. पण सिंधूला सुरुवातीची ट्रेनिंग महबूब अली यांनी दिली होती.  
 
30 मार्च 2015ला सिंधूला भारताचे चवथे सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.  
2014मध्ये सिंधूने एफआयसीसीआय ब्रेकथ्रू स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2014 आणि एनडीटीव्ही इंडियन ऑफ द इयर 2014चे अवार्ड जिंकले.  
 
मागील तीन वर्षांपासून सिंधू सकाळी 4:15 वाजता उठते आणि बॅडमिंटनची प्रॅक्टिस करते.  
एक रेल्वे कर्मचारी आणि माजी  व्हॉलीबॉल खेळाडू सिंधूच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या ट्रेनिंग दरम्यान समर्थन करण्यासाठी 8 महिन्याची सुटी घेतली होती.
2010 मध्ये ती महिलांचे टूर्नमेंट उबेर कपमध्ये भारतीय टीमचा भाग बनली होती. 2014मध्ये ग्लासगो राष्ट्रमंडल खेळांमध्ये सिंधू सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली होती. जेव्हाकी 2015मध्ये ती डेनमार्क ओपनच्या फायनलमध्ये पोहोचली होती. याच वर्षी तिने मलेशिया मास्टर्स ग्रां प्री मध्ये एकलं खिताब देखील जिंकला होता.  
 
10 ऑगस्ट 2013ला सिंधू भारताची पहिली एकलं खेळाडू बनली, जिने वर्ल्ड चँपियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते.  
 
सिंधूबद्दल तिचे आदर्श गोपीचंद म्हणतात की सिंधू कधीही पराभव स्वीकारत नाही आणि ती जे मनात निश्चिय करते त्याला पूर्ण करण्यासाठी आपले 100 टक्के देते. 

वेबदुनिया वर वाचा