कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळेल : गेहलोत

वेबदुनिया

गुरूवार, 21 जुलै 2011 (16:29 IST)
आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांनी मत व्यक्त केले की ‘कबड्डी खेळाला लवकरच ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर या खेळाचे महत्त्व वाढले असून, खेळाडूंनी या देशी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे.

महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहाकार्याने म्हाळुंगे-बालेवाडी येथिल छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीच्या प्रशिक्षक व मार्गदर्शकांसाठी मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गेहलोत ते बोलत होते त्यावेळी त्यांनी वरिल व्यक्तव्य केले.

वेबदुनिया वर वाचा