ऑलिम्पिकमध्ये 5,000 डोप टेस्ट!

वेबदुनिया

बुधवार, 20 जुलै 2011 (10:43 IST)
पुढील वर्षी होणारे लंडन ऑलिम्पिक डोपिंगमुक्त व्हावे, यासाठी आयोजकांनी कंबर कसली असून या क्रीडा महाकुंभात 5,000 डोपिंग चाचण्या घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

लंडन ऑलिम्पिकच्या ड्रग्ज कंट्रोल सेंटरचे प्रमुख डेव्हीड कोवान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘5,000 खेळाडूंची उत्तेजकद्रव्य चाचणी घेण्याची ही ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिलीच वेळ असेल. यासाठी मोठी प्रयोगशाळा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल. डोपिंगबाबत अचूक निदान करणारी उपकरे आमच्याकडे उपलब्ध आहे. हे ऑलिम्पिक डोपिंगमूक्त असावे, हा आमचा उद्देश आहे. यात सहभागी होणारे खेळाडू सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा आहे.’’

वेबदुनिया वर वाचा