ऑलिंपिक पद मिळविण्याचे लक्ष्य: सायना

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (10:10 IST)
नवी दिल्ली- ऑलिंपिक पदक मिळवणे आता माझे लक्ष्य असल्याचे भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने म्हटले आहे. रिओ ऑलिंपिकसाठी मिळत असलेल्या सर्वांच्या सहकार्यावरही तिने आभार व्यक्त केले आहे.
 
क्रीडा मंत्रालय, प्रशिक्षक, चाहते अशा सर्वांनी मला आजवरच्या माझ्या वाटचालीमध्ये सहकार्य केले, व आताही ते मिळत आहे. 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये सायनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

वेबदुनिया वर वाचा