ऑलिंपिकसाठी संदीप शेजवळला पा‍त्रता!

सोमवार, 25 जुलै 2011 (11:08 IST)
जागतिक जलतरण स्पर्धेस आश्‍वासक सुरवात करताना संदीप सेजवळने पहिल्याच दिवशी लंडन ऑलिंपिकची पात्रता वेळ नोंदवली. संदीपने शंभर मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत 1 मि. 2.62 सेकंद अशी वेळ दिली.

ऑलिंपिकसाठीची पात्रता वेळ 1 मि. 2.92 सेकंद अशी होती. वीरधवल खाडेने 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीत समाधानकारक कामगिरी केली. त्याने 24.65 सेकंद अशी वेळ नोंदवली; पण त्याची उपांत्य फेरी 0.69 सेकंदाने हुकली.

वेबदुनिया वर वाचा