ऑलिंपिकसाठी लंडनवर पोलिसांची नजर!

वेबदुनिया

बुधवार, 3 ऑगस्ट 2011 (17:25 IST)
माहिती आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या सुरक्षेसाठी लंडनमध्ये तब्बल 27 हजार पोलिस आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, सुमारे 12 हजार पोलिस अधिकारी या काळात लंडनच्या सुरक्षाव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून असतील, तर लंडन ऑलिंपिक संयोजन समिती (एलसीओजी) दहा ते पंधरा हजार खासगी सुरक्षारक्षकांची मदत घेणार आहे.

शांततेच्या काळातील सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था या स्पर्धांच्या काळात असेल, असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय ऑलिंपिक सुरक्षा समन्वयक ख्रिस ऍलिसन म्हणाले, ""देशातील सुरक्षाव्यवस्थेवरील खर्चामध्ये कपात करण्यात आली असताना ऑलिंपिकचे आव्हान समोर असेल. यामुळे विविध देशांचे संघ आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची चिंता काही काळ वाटत होती. पण या क्षणी तरी सुरक्षेची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.''

वेबदुनिया वर वाचा