उत्तेजक चाचणीत मारिया शारापोव्हा दोषी

मंगळवार, 8 मार्च 2016 (16:29 IST)
ग्रँड स्लॅम किताब तब्बल पाच वेळा जिंकणारी मारिया शारापोव्हाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उत्तेजक चाचणीत दोषी असल्याचं मान्य केलं आहे.
 
मधुमेह आणि लो मॅग्नेशियम अर्थात लोहाची कमरता असल्यामुळे मेल्डोनियम सेवन केल्याचं मारियाने म्हटलं आहे. मात्र मेल्डोनियमला ‘जागतिक उत्तेजक पदार्थ सेवन प्रतिबंध समिती’ अर्थात ‘वाडा’ने 1 जानेवारीलाच बंदी घातली आहे.
 
आरोग्याच्या दृष्टीने 10 वर्षांपासून मेल्डोनियम नावाचं औषध घेत असल्याचं मारियाने सांगितलं. मात्र मेल्डोनियम सेवनावर बंदी आहे. त्यामुळे या औषधाच्या सेवनाचा फटका उत्तेकजक चाचणीत बसल्याचं मारियाने म्हटलं आहे. ‘नाईकी’ कंपनीने मारियासोबतचा करारही रद्द केला आहे.

वेबदुनिया वर वाचा