ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतसिंगने तब्बल चार गोल करून भारताच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला. हरमनप्रीतने 10 व्या मिनिटाला भारताने खाते उघडले. पेनल्टी कॉर्नरवर त्याने भारताला एक सनसनाटी गोल करून दिला. त्यानंतर पाचच मिनिटांनी त्याने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर तडाखेबंद फटका मारून गोल केला. भारताने आघाडी मिळवत 5-1 अशी वाढविली आणि तेथेच विजयावर शिक्कामोर्तब झाले.