विजेंदरला दिलासा

WD
भारताचा ऑलिम्पिक विजेता भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर याच्यावर अंमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप होता. तथापि, डोप चाचणीत त्याने अंमली पदार्थ सेवन केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विजेंदरला दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यासंबंधीचा खुलासा केला. विजेंदर याचे रक्त आणि युरिनचे नमुने घेतले होते. त्याची तपासणी केली असता निगेटीव्ह रिझल्ट आला आहे, असे क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. याबरोबरच अन्य बॉक्सरच्याही टेस्ट निगेटीव्ह आढळून आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे विजेंदरसह अन्य बॉक्सरवरील संकट टळले आहे. चार मार्च रोजी जिरकपूरचा एक अनिवासी भारतीय अनुपसिंग कहलोनच्या घरी १३० कोटी रुपयाचे हेरॉईन सापडले. त्याच्या घराजवळच विजेंदरच्या पत्नीची कार सापडली होती. त्यामुळे त्याच्याशी विजेंदरचे नाव जोडले गेले. त्यामुळे तो अडचणीत सापडला होता.

क्रीडा मंत्रालयाच्या आवाहनानुसार राष्ट्रीय अ‍ॅन्टी डोम्पिंग एजन्सीने विजेंदरसह अन्य बॉक्सरचे रक्त आणि यूरिनचे नमुने घेतले होते. त्याची तपासणी केली असता त्यांची चाचणी निगेटीव्ह दाखवल्याचे आज स्पष्ट झाले. या अगोदर विजेंदरवर अंमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप होता. त्यानंतर पंजाब पोलिसांनी विजेंदरने १२ वेळा अंमली पदार्थ सेवन केल्याचा दावा केला होता.

वेबदुनिया वर वाचा