रोहन चांगला मित्र: सानिया

सोमवार, 14 डिसेंबर 2015 (10:17 IST)
नवी दिल्ली- सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना ही जोडी टेनिस कोर्टावर खूपच जमली. मात्र, ही जोडी टेनिस कोर्टाबाहेरही उत्तम आहे. या दोघांमध्ये मैत्रीचे दृढ संबंध आहेत, असे टेनिसस्टार सानियाने सांगितले. मात्र, आगामी रिओ ऑलिंपिकमध्ये मिश्र दुहेरीतील जोडीदारावर त्यांनी अजूनही विचार केलेला नाही. ऑलिंपिक जोडीदार निवडीसाठी अजून सहा महिन्यांचा काळावधी आहे. त्यामुळे यावर विचार केला जाईल. असे सानियाने सांगितले.

सानिया आणि बोपन्ना ही जोडी आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीगस्पर्धेत इंडियन एसेसकडून खेळत आहेत. त्यांनी वर्तमान सत्रात मिश्र दुहेरीतील एकही सामना गमावला नाही.

वेबदुनिया वर वाचा