मायकल शुमाकर कोमामधून बाहेर; मिळाला डिस्चार्ज

मंगळवार, 17 जून 2014 (10:18 IST)
फॉर्म्युला वन'मध्ये सातवेळा जगज्जेता ठरलेला रेसर मायकल शूमाकर तब्बल सात महिन्यांनंतर कोमामधून बाहेर आहे. त्याची प्रकृती ठणठणीत असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाल्याचे त्याचे कुटूंबियांनी  सांगितले 

जर्मनीच्या 44 वर्षीय शूमाकर यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आल्प्स पर्वतरांगेतील मेरीबेल रिसॉर्ट येथे स्किईंग करताना अपघात झाला होता. शुमाकर यांचे डोक दगडावर आपटून मोठी दुखापत झाली होती. शुमाकर यांना तातडीने ग्रेनोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. काही दिवसांत ते कोमात गेले होते. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल फेडरेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व मेंदू आणि कण्याचे तज्ज्ञ जेरार्ड सैलंट यांनी शूमाकर यांच्यावर उपचार सुरू होते.

वेबदुनिया वर वाचा