महिलांचा हॉकी सामना बरोबरीत

शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (10:13 IST)
भारतीय महिला हॉकी संघाने यजमान अर्जेटिनाविरुद्धचा दुसरा हॉकी सामना 2-2 असा बरोबरीत रोखला. भारतीय महिला हॉकी संघ सद्या अर्जेटिनाच्या दौर्‍यावर आहे. या सामन्यात 27व्या मिनिटाला मेरीनोने अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. 44व्या मिनिटाला कर्णधार रितू राणीने भारताचा दुसरा गोल केला. 56व्या मिनिटाला मेरीनोने अर्जेटिनाचा तसेच वयैक्तिक दुसरा गोल नोंदवून हा सामना बरोबरीत रोखला.  

वेबदुनिया वर वाचा