फीफा वर्ल्डकप 2014: आज भव्य उद्घाटन सोहळा

गुरूवार, 12 जून 2014 (11:26 IST)
फीफा वर्ल्डकप 2014 साठी ब्राझील सज्ज झाले आहे. देशातील जनतेच्या विरोधाचा संयमाने सामना करत ब्राझील सरकारने मोठ्या थाटात या विश्वस्पर्धेचे आयोजन केले आहे. आज, गुरुवारी होणार्‍या भव्या उद्‍घाटन सोहळ्याला प्रसिद्ध सिंगर जेनिफर लोपेझच्या सहभागी होणार आहे. जेनिफर लोपेझची उपस्थिती हेच सोहळ्याचे आकर्षण असेल. लोपेझ, पिटबूल आणि त्यांचे सहकारी स्पर्धेचे अधिकृत "वुई आर वन... हे गीत सादर करणार आहे. लोपेझने आपली नाराजी विसरून सोहळ्यात सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे फिफाने स्वागत केले आहे.

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी सहाशेहून अधिक पात्रता फेर्‍या घेण्यात आल्या होत्या. त्यातून 32 संघांची या स्पर्धेसाठी निवड करण्‍यात आली आहे. सन 2010 मध्ये  दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा झाली होती.

उद्‌घाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून बेल्जियमच्या डाफने कॉनेझ यांनी या सोहळ्याचे दिग्दर्शन केले आहे. फुटबॉलवेड्या ब्राझीलला हा सोहळा अर्पण केल्याचे पंतप्रधानांनी संबोधित केले आहे.त्यामुळे सोहळ्यात ब्राझीलच्या लाइफस्टाईलचे सादरीकरण करण्यात येईल. उद्‌घाटन सोहळा अवघ्या 25 मिनिटांचा असला तरी त्यासाठी तब्बल 20 तासांची मेहनत घ्यावी लागली आहे. विशेष म्हणजे तब्बल 84 तास या सोहळ्याचा सराव करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा