पुणे- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सतरा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या नेहरू करंडक राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत क्रीडापीठ विभागाचे प्रतिनिधित्व करणार्या पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने विजेतेपद मिळविले. क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी दुहेरी विजेतेपद मिळविले असून, मुलींच्या गटातही ते विजेते ठरले होते. कोल्हापुराने तिसरा क्रमांक पटकविला.