नदाल अमेरिका ओपनमध्ये खेळणार नाही

WD
स्पेनचा स्टार टेनिस खेळाडू रफाल नदालला दुखापत झाल्याने अमेरिका ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

विम्बल्डनमध्ये हार पत्करावी लागल्यानंतर नदालने कोणतीही स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. दुखापतीमुळे त्याला ऑलिंपिकमध्येही सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे स्पेनकडून ध्वजवाहक होण्याची संधीदेखील त्याला गमवावी लागली होती.

मला हे सांगताना दुख होत आहे की, मी अनेरिका ओपनमध्ये सहभागी होणार नाही. माझ्या सर्व चाहत्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद, असे त्याने ट्विटरवर म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा