नदालचे नववे विजेतेपद

सोमवार, 9 जून 2014 (11:48 IST)
नदालच क्ले किंग

 
स्पेनच राफेलने अत्यंत अटीतटीच संघर्षपूर्ण चार सेटसच्या लढतीत सर्बिायाच्या नोवाक जोकोविकला नमवून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

नदालने पुरुष एकेरीच अंतिम सामन्यात जोकोविकचा 3-6, 7-5, 6-2, 6-4 असा पराभव केला. हा सामना चारतास सहा मिनिटांचा ठरला. या मॅरेथॉन लढतीत पहिल्या सेटसच्या पिछाडीनंतर पुढचे तीन सेट जिंकून नदालने विजेतेपद मिळविले. नदालने फ्रेंच स्पर्धेचे नववे तर लागोपाठ पाचवे विजेतेपद पटकाविणचा पराक्रम केला. पहिला सेट जोकोविकने 44 मिनिटांत 6-3 ने सहजपणे घेतला. दुसरा सेट आणखी रंगला व नदालने 60 मिनिटांत हा सेट 7-5 ने घेतला आणि 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा सेट हा सुध्दा पन्नास मिनिटे चालला. नदालने हा सेट 6-2 असा सहजपणे घेऊन 2-1 अशी आघाडी घेतली.

दुसरा व तिसरा सेट संघर्षपूर्ण ठरला. दोघेही तुल्बळ खेळाडू आहेत. त्यामुळे एकेक गुणासाठी संघर्ष झाला. दोघांमधील एक रॅली तर दहा मिनिटे झाली आणि या गेममध्ये सहा डय़ूस होते. नदाल हा डावखुरा असल्यामुळे जोकोविक त्याला त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत होता.

नदालचे फोरहँडचे फटके जबरदस्त होते. दोघांनीही बिनतोड सर्व्हिस केल्या. दोघांनीही फटके दुरून माररण्याचा चुका केल्या. नदालने पहिल्या सेटसमध्ये तीन, दुसर्‍या सेटसमध्ये दोन आणि तिसर्‍या सेटसमध्ये चार असे नऊ ब्रेक पाँईटस घेतले.

नदालने पहिल्या सर्व्हिसवर 67 टक्के तर जोकोविकने 63 टक्के यश मिळविले. चौथा सेटही 57 मिनिटे चालला आणि नदालने तो 6-4 ने घेतला. जोकोविक याच्या सर्व्हिसवर नदालने विजय मिळविला. जोकोविकने सर्व्हिस करताना डबल फॉल्ट केला व नदाल विजयी ठरला.

वेबदुनिया वर वाचा