जगातिल पहिल्या क्रमांकाचा सर्बियन टेनिसपटू व माजी विजेता नोवाक जोकोविच आणि सहावेळचा विजेता स्विट्झरलँडचा रॉजर फेडरर सोप्या विजयासहित विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये दाखल झाले आहेत.
सेमिफायनलमध्ये या दोघांमध्ये भिडत होणार आहे. जोकोविचने जर्मनीच्या फ्लोरियन मेयरला सलग सेटमध्ये ६-४, ६-१, ६-४ हरवले तर फेडररने रशियाच्या मिखाइल यूजनीचा ६-१, ६-२, ६-२ ने पराभव करत आगेकूच केली.