कुस्ती २०२० मधील ऑलिम्पिकमधून हद्दपार

मंगळवार, 12 फेब्रुवारी 2013 (18:32 IST)
PR
FILE
कुस्ती २०२० मधील ऑलिम्पिकमधून हद्दपार झाली असून मॉडर्नपेंटाथलन या केळास कायम ठेवून कुस्तीस हटवण्याचा विचित्र निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे.

यामुळे कुस्तीस २०२० मधील ऑलिम्पिकमध्ये समाविस्ट व्हायचे झाल्यास नव्याने अर्ज दाखल करावा लागेल. पेंटाथलन हा अधिक जोखमीचा खेळ मानण्यात येते. आयओसी मंडळाने सद्याच्या ऑलिम्पिक खेळांमधील २६ खेळांची समीक्षा केल्यानंतर हा निर्णय घेतला.

एक खेळ हटवण्यात आल्याने समितीस वर्षअखेर कार्यक्रमात नवीन खेळ जोडण्याची संधी मिळेल. कुस्तीत फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन स्पर्धा होते.

गेल्या वर्षात लंडन ऑलिम्पिक मध्ये फ्रीस्टाइल प्रकारात ११ सुवर्ण व ग्रीको रोमन प्रकारात ६ सुवर्णांचा समावेश होता.
आयओसी कार्यकारी मंडळाची रशियात पीटर्सबर्ग मध्ये बैठक होईल, यामध्ये २०२० स्पर्धेत समावेश करण्यात येणार्‍या खेळांबाबत निर्णय होईल. यासंबंधी अंतिम निर्णय सप्टेबर मध्ये अर्जेंटीनात होणार्‍या आम सभेत घेण्यात येईल. (भाषा )

वेबदुनिया वर वाचा