कलमाडींना धक्का

WD
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी सुरेश कलमाडी यांना भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपदाची पुन्हा निवडणूक लढवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णत: क्रीडा आचारसंहितेच्या नियमास अनुसरुन झाली पाहिजे, असे गुरुवारी उच्च न्यायालयाने यांदर्भातील सुनावणीवेळी सांगितले. तसेच क्रीडा आचारसंहितेचा नियम कलमाडी यांना निवडणूक लढवण्यास अनुमती देत नाही, असेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.

गेली 18 वर्षे कलमाडी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांना तुरुंगातही जावे लागले आहे. सध्ये ते जामिनावर बाहेर आले आहेत. न्यायालयाने गुरुवारी दिलेला निकाल हा कलमाडी यांना मोठा धक्का समजला जात आहे. घोटाळा प्रकरणावरूनच कलमाडी यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षपदावरूनही त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. सध्या विजयकुमार मल्होत्रा हे भारतीय ऑलिम्पिक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

वेबदुनिया वर वाचा