कधी माझेच स्ट्रोक्स विसरते : सायना

वेबदुनिया

मंगळवार, 24 एप्रिल 2012 (12:05 IST)
WD
कधी कधी मी आपलेच स्ट्रोक्स विसरून जाते. त्यामुळे मला त्याचा सातत्याने आणि कठोरपणे सराव करावा लागतो, असे भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालाने म्हटले आहे. सायना सध्या योनेक्स इंडिया ओपन अजिंक्यपद स्पर्धेसाठी जोरदार तयारी करीत आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद याच्या मार्गदर्शनाखाली सिरीफोर्ट परिसरात सायना आपल्या आक्रमणाला अधिक धार आणण्याचा कसून सरवा करीत आहे. सायना नेहवाल हिने दोन वेळा इंडो‍नेशियातील स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. इंडिया ओपन ही घरच्या मैदानावरील एकमेव स्पर्धा असल्याने ही स्पर्धा जिंकण्यास ती उत्सुक आहे. तसेच या स्पर्धेत ती यशस्वी झाली तर त्याचा लाभ तिला जुलैमधील लंडन ऑलिम्पिकसाठी होणार आहे. सायनाचे लंडन ऑलिम्पिकसाठीचे स्थान यापूर्वीच पक्के झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा