ऑलिम्पिकची दारे भारतासाठी बंद!

WD
भारतीय ऑलिम्पिक महासंघातील सरकारी हस्तक्षेप बेकायदा ठरवून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारताला निलंबित केले. यामुळे भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक, राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. आयओएच्या निवडणुकीत ऑलिम्पिक नियमांचे पालन न केल्याचा ठपका भारतावर ठेवण्यात आला आहे.

या निर्णयामुळे आयओसीकहून देशांतर्गत क्रीडा विकासासाठी मिळणारा निधी बंद होईल व अधिकार्‍यांनाही ऑलिम्पिक संदर्भातील कार्यक्रम बैठकात सहभाग घेता येणार नाही.

वेबदुनिया वर वाचा