बिलबाव, स्पेन- विद्यमान विजेत्या विश्वनाथन आनंदला बिलबाव मास्टर्स फायनल बुद्धिबल स्पर्धेच्या दुसर्या फेरीतही संघर्ष करावा लागल्याने बरोबरीतच समाधान मानवे लागले. यावेळी चीनच लिरेन डिंगने त्याला बरोबरीत रोखल्याने आनंदला संयुक्त दुसरे स्थान मिळाले आहे. सलग दोन डाव अनिर्णित राहिल्याने जेतेपद स्वत:कडेच राखण्यासाठी आनंदवरील दडपण आता वाढले आहे. या स्पर्धेच्या अजून चार फेर्या बाकी असून त्यापैकी तीन डावांत त्याला काळ्या मोहरांनी खेळावयास मिळणार आहे.