साहित्य : १ नारळ, गूळ- पाव किलो, वेलची, जायफळ, मैदा- पाव किलो, रवा- २ वाटय़ा, तूप, चवीपुरते मीठ.
कृती : नारळाचा किस, गूळ, वेलची, जायफळ एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावा. नंतर कढईत तूप घालून पुरण तयार करून घ्यावं. मैदा, रवा, मीठ एकत्र भिजवून घ्यावं. पिठाच्या वाटय़ा करून त्यामध्ये सारण भरावं. वरून बंद करून नंतर पोळपाटावर मैदा लावून लाटावं. नंतर तव्यावर भाजावं. वर तूप सोडावं.