उगाडी पचडी

WD
साहित्य: कडुलिंबाचा मोहोर- २ टीस्पून, बारीक किसलेला गूळ- ४ टीस्पून, एका लहानशा गुळाच्या खडय़ाइतक्या चिंचेचा कोळ, लाल मिरची पावडर- अर्धा टीस्पून, मोहरी- अर्धा टीस्पून, चवीपुरते मीठ, तेल- १ टीस्पून, बारीक किसलेली कैरी- १ टेबलस्पून, पाणी- १ कप

कृती: कैरीचा किस आणि चिंचेचा कोळ एकत्र उकळवून घ्यावा. कैरी अगदी मऊ होईपर्यंत हे मिश्रण उकळवावं. त्यानंतर या मिश्रणामध्ये गूळ घालावा. हा गूळ विरघळेपर्यंत हे सगळं मिश्रण उकळवावं.

त्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवावं. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकावी. ही मोहरी चांगली तडतडू दे. त्यामध्ये कडुलिंबाचा मोहोर घालावा. हा मोहोर चांगला तांबूस होईपर्यंत त्यामध्ये तळावा. हा मोहोर तांबूस झाला की त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ घालावं. ही फोडणी कैरी आणि चिंच-गुळाच्या मिश्रणामध्ये घालावी.

वेबदुनिया वर वाचा