आंबा इडली

बुधवार, 11 मे 2016 (15:20 IST)
साहित्य: तांदळाचा रवा, आंब्याचा रस, साखर, ओले खोबरे, मीठ, खायचा सोडा, वेलदोड्याची पूड.

कृती: खोबरे किसून घ्यावे. तांदळाचा रवा कोरडाच मंद आचेवर भाजून घ्यावा. या भाजलेल्या पिठात आंब्याचा रस, साखर, किसलेले खोबरे, खायचा सोडा, मीठ, साखर, वेलदोड्याची पूड सर्व एकत्र करून जाडसर पीठ तयार करून ठेवावे. इडलीपात्राला तेल लावून हे पीठ ओतून वाफवावे. आंब्याच्या रसाची इडली दुधात बुडवून खाल्ल्यास स्वादिष्ट लागते.
 

वेबदुनिया वर वाचा