साहित्य : 1 किलो परवल, आलं, लसुण, 4-5 हिरव्या मिरच्या, 4 मध्यम आकाराचे बटाटे, मीठ चवीनुसार, तेल.
कृती : परवलांना साली काढून मधून चिरा देऊन आतील मगज काढावा. त्या मगजाला वाटावे आणि त्यात बटाटे चुरून मिसळावे. सर्व मसाले मिसळून त्या मिश्रणाला परवलमध्ये भरावे. जर वाटले तर परवलात मसाला भरण्याआधी थोडेसे भाजावे. नंतर भरल्यानंतर त्यांना ब्रेडच्या चुऱ्यात गुंडाळून तांबूस होईपर्यंत तळावे. त्याने ते जास्त कुरकुरीत होतील. प्लेटममध्ये ठेवून पातळ-पातळ स्लाइस कापून सजवावे.