कृती : सर्वप्रथम दुधी भोपळा सोलून त्याचा किस करून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी जिऱ्याची फोडणी घालावी. भोपळ्याचा किसाला तेलात घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. वरून बेसन लावावे व चांगले एकजीव करावे. 5 मिनिटाने त्यात बाकी सर्व साहित्य घालून झाकण ठेवून त्यावर पाणी घालून शिजू द्यावे. सर्व्ह करताना कोथिंबीर व लिंबू घालून सर्व्ह करावे.