कुंभ मेळ्यात जाऊ शकत नसाल तर हे करा, पुण्य लाभेल

प्रयागे माघ पर्यन्त त्रिवेणी संगमे शुभे।
निवासः पुण्यशीलानां कल्पवासो हि कश्यते॥- (पद्‌मपुराण)
 
उज्जैन येथे सिंहस्थ मेळा भरला आहे. धार्मिक लोकं तेथे जाण्याचे इच्छुक असतात तरी कित्येकदा काही कारणांमुळे सर्व कुंभमध्ये जाऊ पात नाही. ही वेळ दान, जप, ध्यान आणि संयमाची वेळ आहे. अशात प्रश्न आहे की कुभं मेळ्यात न जातानाही पुण्य कसे मिळवू शकतो?
कुंभ मध्ये कल्पावास चालतो. जेवढं महत्त्व कुंभमध्ये स्नान करण्याचे आहे तेवढंच कल्पवासमध्ये नियम-धर्माचे पालन करण्याचे महत्त्व आहे. दुसरीकडे कुंभमध्ये प्रवचन ऐकून, दान करून आणि पितरांना तरपण देऊन लोकं पुण्य कमावतात. आपणही हे सर्व करून पुण्य कमावू शकता.

1. दररोज हळद मिसळलेल्या बेसनाने स्नान करावे. सकाळ- संध्याकाळ संध्यावंदन करून प्रभू विष्णूची आराधना करावी आणि या मंत्राने स्वत:ला पवित्र करावे.
 
संध्यावंदन मंत्र:
ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा।
यः स्मरेत पुण्डरीकांक्ष से बाह्याभ्यंतरः शुचि।
या मंत्राने आचमन करा-
 
ॐ केशवायनमः ॐ माधवाय नमः ॐ नारायणाय नमः जप करा.
 
हातात नारळ, पुष्प आणि द्रव्य घेऊन हे मंत्र वाचा. यानंतर आचमन करून गणपती, गंगा, यमुना, सरस्वती, त्रिवेणी, माधव, वेणीमाधव आणि अक्षयवटाची स्तुती करा.

2. कुंभ चालत असताना दररोज एक वेळी सात्त्विक भोजन करावे आणि मौन राहावे.

3. या काळात आपण योग्य व्यक्तीला दान देऊ शकता. दानमध्ये अन्नदान, वस्त्रदान, तुलादान, फलदान, तीळ किंवा तेलदान करू शकता.

4. गाय, कुत्रा, पक्षी, कावळा, मुंग्या आणि मासोळ्यांना भोजन द्यावे. गायला खाऊ घातल्याने घरातील वेदना दूर होतील. कुत्र्यांना खाऊ घातल्याने शत्रूपासून मुक्ती मिळेल. कावळ्यांना खाऊ घातल्याने पितृ प्रसन्न होतील. पक्ष्यांना दाणा टाकल्याने व्यवसाय आणि नोकरीत लाभ होईल. मुंग्यांना खिलवण्याने कर्ज फेडले जाईल. आणि मासोळ्यांना अन्नदान केलेल्याने समुद्धी येईल.

5. संकल्प घ्या: कोणत्याही प्रकाराचे व्यसन करणार नाही. क्रोध आणि द्वेषामुळे कोणतेही कार्य करणार नाही. वाईट संगत आणि कुवचनांपासून दूर राहीन आणि आई-वडील आणि गुरुंची सेवा करेन.

वेबदुनिया वर वाचा