-हरदीप कौर
श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर 1699मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले.
गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते.