Guru Nanak Jayanti 2021: जाणून घ्या गुरु नानक जयंती केव्हा आणि त्यामागील इतिहास
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (22:27 IST)
गुरु नानक जयंती 2021 या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी आहे. दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरी केली जाते आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी, म्हणजेच कार्तिक पौर्णिमा गुरु नानक जयंती साजरी केली जाते. यासोबतच शीख धर्मीयांचा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यासाठी महिनाभर आधीच तयारी सुरू केली जाते. या दिवशी ढोल वाजवून प्रभातफेरी काढली जाते, ज्यामध्ये शीख समुदायाचे लोक सक्रियपणे सहभागी होतात. लोक गुरुद्वारातील सेवा कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होतात.
गुरु नानक जयंतीचा इतिहास
शीख धर्माचे पहिले गुरु, गुरू नानक देवजी यांचा जन्म 1469 मध्ये झाला. गुरु नानक देव यांचा जन्म भोई की तलवंडी येथे झाला, ज्यांना राय भोई दी तलवंडी असेही म्हणतात. हे ठिकाण आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नानकाना साहिबमध्ये आहे.
आता या जागेला नानक देव यांचे नाव देण्यात आले. येथे देश-विदेशातील लोक प्रसिद्ध गुरुद्वारा ननकाना साहिबला भेट देण्यासाठी येतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. हा गुरुद्वारा 'ननकाना साहिब' शेर-ए पंजाब म्हणून ओळखल्या जाणार्याी शीख साम्राज्याचे राजा महाराजा रणजीत सिंह यांनी बांधला होता.
गुरु नानकजी कोण होते
गुरू नानकजींनी शीख समाजाची पायाभरणी केली होती असे म्हणतात. गुरु नानक देव हे शीख समाजाचे पहिले गुरु आणि या धर्माचे संस्थापक देखील आहेत. त्यांना नानक देव, बाबा नानक आणि नानक शाह या नावानेही ओळखले जाते. एवढेच नाही तर लडाख आणि तिबेट प्रदेशात त्यांना नानक लामा असेही म्हणतात. भारताव्यतिरिक्त गुरू नानक देव यांनी अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्येही प्रचार केला. वयाच्या 16 व्या वर्षी सुलखानी नावाच्या तरुणीशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना श्रीचंद आणि लखमीदास ही दोन मुले झाली. 1539 मध्ये पाकिस्तानच्या कर्तारपूर येथे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूपूर्वीच, गुरू नानकांनी त्यांचे शिष्य भाई लहानाच्या नावावर उत्तराधिकारी घोषित केले, जे नंतर गुरू अंगद देव म्हणून ओळखले जाऊ लागले. गुरू अंगद देव यांना शीख धर्माचे दुसरे गुरू मानले जात होते. गुरु नानक देव यांनी आपले जीवन मानव समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले होते.
(अस्वीकरण: या लेखात दिलेली सूचना आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)