Shravan 2023 History श्रावण महिना इतिहास, कोणी केला होता पहिला सोमवारचा उपवास ?

Shravan 2023 History श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मास मानला जातो. या महिन्यात महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्तव आहे.
 
श्रावणात शिव पूजा कशी सुरु झाली 
श्रावण महिन्याचा इतिहास समुद्रमंथनाशी संबंधित आहे. समुद्रमंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर आले तेव्हा ते भगवान शिवाने प्यायले होते. 
विषामुळे भगवान शंकराचा कंठ निळा झाला होता. या कारणास्तव त्यांना नीलकंठ असेही म्हणतात. महादेवाचे शरीर विषाने जळू लागले.
 
तेव्हा माता पार्वतीने शिवशंकरांच्या गळ्यावर हात ठेवून ते विष शरीरात जाण्यापासून थांबवले होते प्रथमच शिवजींना जल अर्पण केले.
 ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी श्रावण महिना सुरू होता आणि तेव्हापासून श्रावणात  शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली. 
माता पार्वती यांच्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मा देव यांच्यासह सर्व देवी-देवतांनी देखील भगवान शिवाचा जल आणि दुधाने भव्य अभिषेक केला.
 
कोणी ठेवला होता पहिला सोमवार 
असे मानले जाते की जेव्हा समुद्रमंथनानंतर पहिला सोमवार आला तेव्हा माता पार्वतीने प्रथमच सोमवारचा उपवास ठेवला आणि शिवाची पूजा केली. तेव्हापासून विवाहित महिलांसाठी श्रावणात शिवाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आणि ती विवाहित महिलांसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक मानली गेली.
 
ग्रंथांमध्ये देखील श्रावणात शिवलिंग पूजा करण्याचे खूप महत्व असल्याचे सांगितले गेले आहे. हे व्रत पाळणाऱ्या महिलांना वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. पार्वतीने स्वतः शिवलिंग पूजनाचे आणि श्रावण सोमवार व्रताचे महत्व सांगताना अखंड सौभाग्य प्राप्तीचा मार्ग असल्याचे सांगितले आहे. माता पार्वतीने श्रावण सोमवार व्रताचे वर्णन मृत्यू, रोग-शोक, विघ्न, अडथळा, नकारात्मकता, कौटुंबिक कलह, अपयश इत्यादींचा नाश करणारे म्हणून केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती