श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्र मंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्ती देवतेच्या मूर्ती स्थापाव्यात.
अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात.
व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.