Offer Shivmuth to shiv शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) कसे करावे

offer Shivmuth to shiv शिवामूठ व्रत हे विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावणी सोमवारी केलं जातं. श्रावणात येणार्‍या सोमवारी 4 प्रकाराचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. नवविवाहित स्त्रियांनी शिवमुष्टिव्रत करावयाचे असते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने, तांदूळ, सुपारी, गन्ध, फूल वाहून पूजा करावी. आणि या क्रमाने धान्याच्या एक-एक मूठ देवावर वाहव्या. धान्यमूठ उभी धरून वाहावी. या मुठी वाहताना पुढील मंत्र म्हणावा-
नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
 
किंवा "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असे तीन वेळा म्हणावे.
 
प्रथम सोमवारी तांदूळ
दुसर्‍या सोमवारी पांढरे तीळ
तिसर्‍या सोमवारी मूग
चौथ्या सोमवारी जवस
आणि पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पित करावे.
 
दिवसभर उपास करावा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपास सोडावा. पाच वर्षांनंतर या व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी. नंतर ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन व्रताची समाप्ती करावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती