नाग पंचमी आणि श्री कृष्ण संबंध
नाग पंचमी पूजेचं एक प्रसंग भगवान श्री कृष्ण यांच्याशी निगडित आहे. बालकृष्ण जेव्हा आपल्या मित्रांसह खेळत होते तेव्हा त्यांना मारण्यासाठी कंस याने कालिया नावाच्या नागला पाठवले होते. आधीतर त्याने गावात दहशत पसरवली. लोकं घाबरु लागले.
एकदा जेव्हा श्री कृष्ण आपल्या मित्रांसोबत खेळत होते तेव्हा त्यांचा चेंडू नदी पडला. ते घेण्यासाठी कृष्ण नदीत उतरले तेव्हा कालियाने त्यांच्यावर आक्रमण केलं पण उलट कालियाला आपला जीव कसा वाचवला हा प्रश्न पडला. त्याने कृष्णासमक्ष माफी मागितली आणि गावकर्यांना त्रास देणार नसल्याचं वचन देत तेथून निघून गेले. कालिया नागावर श्री कृष्ण यांचा विजय देखील नागपंचीम या रुपात साजरा केला जातो.