Nag Panchami 2021: नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त व पूजा विधी

बुधवार, 28 जुलै 2021 (17:18 IST)
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.
 
Nag Panchami 2021
यंदा इंग्रजी महिन्यानुसार, शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 रोजी शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जाईल.
 
नाग पंचमी पूजा मुहूर्त : 05:48:49 ते 08:27:36 पर्यंत.
अवधी : 2 तास 38 मिनिटे.
 
ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचा स्वामी साप आहे. या दिवशी प्रामुख्याने आठ सापांची पूजा केली जाते.
 
अष्टनागांची नावे आहेत- अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख.
 
जर आपण या दिवशी उपवास ठेवत असाल तर चतुर्थीच्या दिवशी एकदा आहार घ्यावा आणि पंचमीला उपवास ठेवावा, संध्याकाळी भोजन ग्रहण करावं.
 
सर्पांची पूजा करण्यासाठी लाकडी पाटावर त्यांचे चित्र किंवा मूर्ती बसवून त्याची पूजा केली जाते.
 
मूर्तीवर हळद, कंकू, रोली, तांदूळ आणि फुले अर्पित केली जातात आणि नंतर कच्चं दूध, तूप, साखर मिसळून नैवेद्य दाखवलं जातं. 
 
पूजन झाल्यावर सर्प देवताची आरती केली जाते.
 
नंतर नाग पंचमी कथा करण्याची पद्धत असते.

कहाणी नागपंचमीची
 
अनेक लोक शिव मंदिरात जाऊन नाग देवतेचे पूजा करतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती