जिवती आईच्या या मंदिरात चॉकलेट, पिझ्झा, पाणुपरीचा प्रसाद वाटला जातो

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (12:26 IST)
कोणत्याही मंदिरात साधरपणे श्रीफळ, खडीसाखर, मिठाई इत्यादी प्रसाद म्हणून भगवंताच्या मूर्तीसमोर ठेवण्यात येतो. पण राजकोटमध्ये एक मंदिर आहे, जिथे पिझ्झा, चॉकलेट, बर्गर, दाबेली, कोल्डड्रिंक्स, सँडविच, पाणीपुरी आणि क्रीम रोल इत्यादी पदार्थांचे देवी आईला प्रसाद म्हणून नैवेद्यात दाखवल्या जातात. या मंदिराचे नाव जीवंतिका आहे, जे 50 वर्षांहून अधिक काळापासून शहरातील राजपूतपरा येथे आहे.
 
येथ यणार्‍या भाविकांना प्रसाद म्हणून लहान मुलांना आवडणारे पदार्थ दिले जातात. असे मानले जाते की जिवती आई भाविकांच्या मुलं-बाळांची रक्षा करते आणि त्यांना प्रत्येक संकटापासून वाचवते. 
 
तसे श्रावणातील दर शुक्रवारी जिवती आईची पूजा केली जाते आणि मुलांच्या रक्षेसाठी प्रार्थना केली जाते. घरोघर हे व्रत ठेवणार्‍या महिला देवीची आराधना करुन गूळ-चण्याचे नैवेद्य दाखवतात. परंतू राजकोटच्या मंदिरात वेगळ्या प्रकारे देवीला नैवेद्य दाखवून मुलांच्या सुरक्षेची प्रार्थना केली जाते. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. अशात या मंदिरात लहान मुलांना आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून देवीसमोर ठेवण्यात येतात. त्यात पाणीपुरी, चॉकलेट, पिझ्झा-बर्गर पासून सँडविच, बिस्किट आणि इतर अनेक पदार्थांचा समावेश असतो.
 
येथे संध्याकाळी देवीची आरती झाल्यावर प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मुलेय येतात कारण येथे प्रसादात त्यांच्या आवडीच्या गोष्टी मिळतील हे त्यांना माहीत आहे.
 
येथे पार्सलद्वारे देखील प्रसाद येत असल्याचे सांगितले जाते. देश-विदेशातील भाविक पार्सलद्वारे प्रसाद पाठवतात. त्यांची इच्छा पूर्ण झाल्यास ते स्वतः येथे येतात. स्थानिक लोक रोज पूजा करतात. 
 
हे मंदिर जय अंबेलाल दवे यांनी नोकरीतून कमावलेल्या पैशातून कोणतीही देणगी न घेता बांधले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देणगी म्हणून मिळणारी रक्कम पुजारी ठेवत नसून ती सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. आजपर्यंत इतक्या वर्षात या मंदिरासाठी कोणाकडूनही देणगी घेण्यात आलेली नाही. लोक स्वतः येऊन देणगी देतात. देणग्यांमधून मिळणारी रक्कम झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि मतिमंद मुलांना भोजन  देण्यासाठी खर्च केली जाते.
 
श्री जयअंबेलाल कल्याणजी दवे हे या मंदिराचे पहिले आचार्य आहेत. त्यांनी श्री जीवंतिकेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी, सार्वजनिक कल्याणासाठी आणि मंदिराच्या विकासासाठी जे काही उपयोग होईल ते केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती