पोळा किंवा बैल पोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे.हा सण शेतकरी बांधव साजरा करतात. हा सण प्रामुख्याने मध्य प्रदेश,छत्तीसगड,आणि महाराष्ट्रात साजरा करतात.या सणाचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे.तेलंगणात याला 'पुलाला अमावस्या '' म्हणतात.तर काही ठिकाणी बेंदूर असे म्हणतात.दक्षिण भागात मट्ट पोंगल आणि उत्तर व पश्चिम भागात याला गोधन असे म्हणतात.
बैलपोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अवसेच्या दिवशी साजरा करतात.या दिवशी शेतकरी आपापल्या बैलाची सजावट करून बैलांची पूजा करतात. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध वस्तुंनी सजवतात,गळ्यात सुंदर घंटा,पायात घुंगरू,शिंगाना रंगवतात. माळी,विविध वस्तुंनी आपल्या बैलांना सजवतात.नटवतात.हा सण पावसाळ्यात पेरणी संपल्यावर साजरा करतात.बैलांना सजवून सर्व शेतकरी बांधव आपले बैल घेऊन गावातील मंदिराजवळ एकत्र होतात.तिथे त्या बैलांची यथोचित पूजा करतात,त्यांना नेवेद्य देतात.
बैलपोळा साठी बैलाची निवड का करतात ?
बैल खूप कष्टकरी आहे.ते शेतीच्या कामासाठी राबत असतात.बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. सध्या शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर केला जातो.पूर्वीच्या काळात शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर करायचे तसेच पूर्वीच्या काळी मोटार वाहने नसायचे तेव्हा बैलगाडीचा वापर केला जात असे.या काळात बैलांनी शेतकऱ्यांना मोठी साथ दिली. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जुडलेला होता.त्याचे आभार मानायचे म्हणून हा सण साजरा केला जातो.