गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||
हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला || निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||
चालेल जागता चटका हा असाच घटका घटका कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ || ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ || त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली || ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||
इकडे हे सिद्दीजवान तो तिकडे अफझुलखान पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||