Kojagiri Purnima ही 5 कामे नक्की करावी

शरद पौर्णिमेला जाणून घ्या काही खास उपाय ज्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन सुख-समृद्धीचा आशीर्वाद देईल.
 
1. पांढरं फुल जसे पांढरे गुलाब, चंपा, चमेली, चांदण्या, कमळ, पांढरा मोती, पांढरे फळं, पांढरे चमकदार कपडे, पांढरं धान्य, पांढरी मिठाई चंद्राला आणि श्रीकृष्णाला अर्पित करावी.
 
2. महालक्ष्मीला पिवळी आणि लाल सामुग्री अर्पित करावी.
 
3. मोर पंखाला बासरीत बांधून पूजा करावी.
 
4. तुपाचा अखंड दिवा प्रजव्लित करावा.
 
5. घरात पाणी ठेवत असलेल्या जागेवर स्वास्तिक काढावं.
 
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूजन आणि आराधना केल्याने वर्षभर लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा प्राप्ती होते. या व्यतिरिक्त मनोबल वाढतं, स्मरणशक्ती वाढते, दमातून मुक्ती मिळते, ग्रह बाधापासून मुक्ती तसेच घरातून दारिद्र्य दूर होतं. या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते अशी धारणा आहे. म्हणून या दिवशी लक्ष्मी देवीची आराधना अवश्य करावी.
 
शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र
ऊं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः
 
शरद पौर्णिमेच्या रात्री सौभाग्य प्राप्ती साठी मंत्र
"पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम् प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे।"

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती