तसं तर प्रत्येक पौर्णिमेला चंद्र बघण्यासारखं असतं परंतू आश्विन महिन्यातील पौर्णिमेची रात्र चंद्राच्या प्रकाशाने उजळलेली असते. शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण, भजन केल्याने आणि चंद्र प्रकाशात ठेवलेल्याने खीर किंवा दुधाच्या नैवेद्य दाखवून सेवन करण्याचे विशेष महत्त्व आहे.
शरद पौर्णिमा दरम्यान चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असून रात्रभर आपल्या प्रकाशाने अमृत वर्षा करत असतो. म्हणून यात ठेवलेलं दूध अमृत समान असतं. अमृत, मनदा (विचार), पुष्प (सौंदर्य), पुष्टी (स्वस्थता), तुष्टी (इच्छापूर्ती), धृती (विद्या), शाशनी (तेज), चंद्रिका (शांती), कांती (कीर्ती), ज्योत्स्ना (प्रकाश), श्री (धन), प्रीती (प्रेम), अंगदा (स्थायित्व), पूर्ण (पूर्णता अर्थात कर्मशीलता) पूर्णामृत (सुख) अश्या चंद्राच्या प्रकाशाच्या 16 अवस्था आहेत. मनुष्याच्या मनात देखील एक प्रकाश आहे आणि मन हे चंद्र आहे. चंद्राच्या घट-बढ प्रमाणेच मनाची स्थिती असते.
या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते अशी धारणा आहे. या मध्यरात्री 'को जागर्ति' म्हणजे 'कोण जागत आहे' असे म्हणत लक्ष्मी देवी पृथ्वीतलावर संचार करीत असते आणि भक्तांच्या आराधनेला प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. उपवास, पूजन व जागरण याचे या व्रतात महत्त्व आहे. कोजागरीच्या रात्री मंदिरे, घरे, रस्ते, उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात.