मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:37 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
धन्य धन्य श्रीसाईसमर्थ । ग्रंथरूपें स्वार्थ परमार्थ । बोधूनि भक्तां करी कृतार्थ । जो कृतकार्यार्थ संपादी ॥१॥
माथां पडतां जयाचा हात । करी जो तात्काळ शक्तिपात । अप्राप्यवस्तु करी प्राप्त । भेदाचा नि:पात करूनि ॥२॥
विरवूनि मी - तूंभाव भिन्न । जया करिताम साष्टांग नमन । ह्रययीं धरी आलिंगून । अनन्य शरण रिघतांचि ॥३॥
नामें भिन्न सागर - सरिता । परी रूपें एकरूपता । वर्षाकाळीं मिळणी मिळतां । उरे न भिन्नता ताद्दश ॥४॥
तेवींच भावें सद्नुरुनाथा । भक्तीं अनन्य शरण जातां । तोही भक्तांस देई निजगुरुता । पाहोनि सद्भक्तता भक्तांची ॥५॥
जयजयाची दीनदयाळा । भक्तोद्धारा परमप्रेमळा । व्यापूनि अखिल ब्रम्हांदमाळा । वससी निराळा शिर्डींत ॥६॥
जातें मांडूनि पाय पसरितां । संत असतां दळण दळीतां । खुंटा ठोकूनि वैरा रिचवितां । विस्मय चित्ता माझिया ॥७॥
तेंच कीं या ग्रंथा मूळ । मनीं इच्छा उद्भवली प्रबळ । कीं हीं ऐसीझं कर्में सकळ । वर्णितां कश्मल हरेल ॥८॥
हरि स्वयें होईल प्रसन्न । तया आवडे तयाहून । कोणीं केलिया निजभक्तकीर्तन । अथवा गुणवर्नन भक्तांचें ॥९॥
आशंकतील श्रोते सज्जन । जयां निराधार वाटेल हें विधान । तिंहीं पहावें भविष्योत्तर - पुराण । त्रिपुरारी कथन करी हें ॥१०॥
हीही सकळ साईंची प्रेरणा । परी लौकिक रीति निदर्शना । तेणेंच अनुमोदिली ही रचना । भक्तकल्याणाकारणें ॥११॥
तैपासाव मासोमासीं । साइसमर्थकथानकासी । या श्रीसाईलीलावलीसी । श्रोते बहु प्रेमेंसी परिसती ॥१२॥
तोचि कीं सई अनुमोदिता । तोच तो माझा बुद्धिदाता । तोच मूळ चेतना चेतविता । तयाची कथा तोच करी ॥१३॥
कीं हा हेमाड निजमतीं । रचितो हा विकल्प न धरा चित्तीं । म्हणोनि श्रोतयां करितों । विनंती । गुणदोष माथीं मारूं नका ॥१४॥
गुण तरी ते साईचे । दोष दिसलिया तरी ते त्याचे । मी तों बाहुलें साईखडयाचें । आधारें नाचें सूत्राच्या ॥१५॥
सूत्रधाराहातीं सूत्र । त्याला वाटेल तें तें चित्र । रंगीबेरंगी अथवा विचित्र । नाचवील चरित्रसमन्वित ॥१६॥
असो आतां हा प्रस्ताव । काय नूतन कथानवलाव । उत्कंठाप्रचुर श्रोतृस्वभाव । गुरुभक्तगौरव त्यां गाऊं ॥१७॥
गताध्याय पूर्ण करितां । पुढील अध्याय सूतोवाचता । ठेविली होती स्मरणाचे माथां । स्फुरे ती आतां परिसावी ॥१८॥
आतां हें गोड आख्यान । श्रोतां परिसिजे सावधान । भक्त प्रेमें घालितां भोजन । परम समाधान साईंन ॥१९॥
निज तान्हिया कनावाळू माई । तैसा निजभक्तां प्रत्यक्ष साई । वसो कुठेंही धांवत येई । कवण त्या होईल उतराई ॥२०॥
देहें वावरत शिर्डींत । परी संचार त्रैलोक्यांत । ये अर्थींचा गोड वृत्तांत । परिसा निजशांत मानसें ॥२१॥
एकदां साईपदसंनिष्ठ । बाळासाहेव भक्तश्रेष्ठा । माता जयांची व्रतवैकल्यनिष्ठ । सर्वांचें अभीष्ठ संपादी ॥२२॥
परोपरीचीं अनेक व्रतें । होतीं घडलीं तियेचे हातें । तयांचें उद्यापन राहिलें होतें । सांग तीं समस्तें व्हावया ॥२३॥
व्रतसंक्या होतां पूर्ण । करावें लागे उद्यापन । ना तों पदरीं न पदे पुण्य । व्रत तें अपूर्ण त्यावीण ॥२४॥
व्रतें पंचवीस अथवा तीस । इतुक्यांचिया उद्यापनास । देव शें - दोनशें ब्राम्हाणांस । जेवावयास आमंत्रित ॥२५॥
म्हणून एक नेमिली तिथी । हें उद्यापन करावयाप्रती । देव जोगांस पत्र लिहिती । कराया विनंती बाबांस ॥२६॥
पहा आपण आलियाविना । नाहीं सांगता या उद्यापना । तरी मान्य करूनि ही प्रार्थना । करावें या दीना आभारी ॥२७॥
मी तों सरकारचा सेवेकरी । पोटालागीं करितों चाकरी । त्यांतचि साधल्या परमार्थही करीं । जाणतसां अंतरीं आपणही ॥२८॥
डहाणूहूनि इतुका दूर । स्वयें यावया मी लाचार । तरी या आमंत्रणाचा स्वीकार । कराल ही फार मज आशा ॥२९॥
ऐसें बापूसाहेब जोग । पत्र बाबांस ऐकविती साङ्ग । म्हणती संपादा हा कार्यभाग । यथासांग देवांचा ॥३०॥
शुद्धभावाचें आमंत्रण । बाबांनीं ऐकूनि घेतलें संपूर्ण । म्हणती “जया माझें स्मरण । निरंतर आठवण मज त्याची ॥३१॥
मज न लागे गाडीघोडी । विमान अथवा आगिनगाडी । हांक मारी जो मज आवडी । प्रकटें मी ते घडी अविलंबें ॥३२॥
तूं मी आणि तिसरा एक । तिघे मिळुनि जाऊं देख । पाठवूनि दे ऐसा लेक । पावेल हरिख लिहिणारा” ॥३३॥
असो बाबा जें जें बोलले । तें तें जोगांनीं देवां कळविलें । देव मनीं आनंदित जाहले । अमोघ बोलें बाबांच्या ॥३४॥
देवांचाही पूर्ण विश्वास । बाबा आतां येतील खास । परी हें जेव्हां अनुभवास । येईल तो दिवस सोनियाचा ॥३५॥
परी देवांस हेंही ठावें । शिरडीखेरीज तीनच गांवें । तेथेंही व्कचितचि बाबांनीं जावें । शिरडींत असावें निरंतर ॥३६॥
मना आलिया सटी - सामासीं । कधीं बाबा जात राहत्यासी । कधीं रुई वा निमगांवासी । वस्ती शिरडीसी अखंड ॥३७॥
या तीन गांवांपलीकडे । जात न केव्हांही कोणीकडे । ते मग इतके लांब इकडे । डहाणूस मजकडे यावे कसे ॥३८॥
परि ते पूर्ण ते पूर्ण लीलावतारी । इच्छामात्रें स्वच्छंचारी । येणें जाणें हें लोकाचारीं । सबाह्याभ्य़ंतरीं परिपूर्ण ॥३९॥
तेथूनि येथें होईल येणें । अथवा येथूनि तेथें जाणें । हीं दोनीही आकाश नेणे । परिपूर्ण पूर्णपणें सबाह्य ॥४०॥
तैसीच बाबांची दुर्गमगती । स्थिरचरीं ते भरले असती । तयां कैंची आगती निर्गती । प्रकट होती स्वच्छंदें ॥४१॥
असो याआधीं एक संन्यासी । एका मासाचिया अजमासीं । आला स्टेशनमास्तरापाशीं । डहाणू - स्टेशानासी निजकार्या ॥४२॥
तो गोशाळाप्रचारक । गोसंस्थेचा स्वयंसेवक । आला वर्गणी मागावया देख । स्थिति सांपत्तिक सुधारावया ॥४३॥
वेष पाहतां दिसे बंगाली । मास्तरानें युक्ति कथिली । गांवांत जा तेथेंच आपुली । व्यवस्था चांगली लागेल ॥४४॥
तेथें आहेत मामलेदार । तयांपुढें मांडा हा विचार । मिळतील शेटसावकार । लावितील हातभार तुम्हांस ॥४५॥
एक मामलेदार वळतां । पट्टी होईल हां हां म्हणतां । या धर्माचिया कार्याकरितां । स्वस्थचित्ता जा तेथें ॥४६॥
हें जों आंत मास्तर बोले । बाहेर घोडयाचे टाप वाजले । स्वयें मामलेदारचि तेथें आले । उतरले गेले स्टेशनांत ॥४७॥
मास्तरातें भेटावयातें । खोलींत जेव्हां प्रवेशले ते । मास्तर संन्यासिया झाले वदते । आले कीं येथेंच मामलेदार ॥४८॥
घ्या आतां बोला काय तें । दैवें हे भेटले तुम्हां आयते । संन्यासी निजमनोगतातें । जाहले निवेदिते त्यांपाशीं ॥४९॥
मग ते दोघे बाहेर आले । तेथेंच एका पेटीवर बैसले । देवांस संन्यासी विनविते झाले । कार्य हें संपादिलें पाहिजें ॥५०॥
गोरक्षणाचें धर्मकार्य । आपण हातीं धरिल्याशिवाय । मज परकिया हातून हें कार्य । होईल का तिळप्राय तरी ॥५१॥
आपण तालुक्याचे अधिकारि । मीतो हा सिसा भिकारी । फिरें लोकाम्चिया दारोदारीं । टाळाया उपासमारी गाईंची ॥५२॥
टाकाल जरी एक शब्द । होईल माझें कार्य जलद । मिळवाल गोमातांचे आशीर्वाद । यश निर्विवाद लाधला ॥५३॥
परिसूनि संन्यासियाची विनंती । देव काय प्रत्युत्तर करिती । गांवांत दुजिया कार्या संप्रती । वर्गणी हातीं घेतलीसे ॥५४॥
रावसाहीब नरोत्तम शेटी । जयां दीनांची दया पोटीं । नगरशेट जे मोठे खटपटी । ते एक पट्टी उगरावती ॥५५॥
त्यांतचि तुमचिया पट्टीस जागा । होईल कैसी तरी सांगा । समय हा नाहीं तुमचिया उपेगा । असो मग मागाहून पाहूं ॥५६॥
तरी आपण दों चार मासीं । थांबूनि या कीं या गांवासी पुढें मग पाहूं त्या समयासी । आज न यासी अनुकूलता ॥५७॥
असो मग तो तेथूनि गेला । झाला असेल महिना याला । तों तो तंग्यांत बैसूनि आला । पुनश्च डहाणूला माधारा ॥५८॥
देवांचिया दारासमोर । वकीर परांजपे यांचें घर । तेथेंच तांगा तांगा थांबल्यानंतर । संन्यासी उतरतां देखिला ॥५९॥
तोचि कीं हा पूर्वील निश्चित । आला कीं आधींच वर्गणीनिमित्त । ऐसें देव मुलातें वदत । अंतरीं शंकित होऊनि ॥६०॥
नाहीं पुरा महिना झाला । तोंच हा येथें किमर्थ आला । विसरला कां पूर्वील बोला । साशंकतेला हें मूळ ॥६१॥
तेणें तेथेंच तांगा सोडिला । तेथेंच कांहीं काळ क्रमिला । आला मग देवांचिया घराला । काय मग लागला वदावया ॥६२॥
दहा वाजावयाचा वेळ । ब्राम्हाणभोजनारंभकाळ । पाहूनि देवांची घालमेल । वदे न मज उतावेळ पैशाची ॥६३॥
आया हूं न पैसेके लिये । आज तो हमकू भोजन चाहिये । देव म्हणाले आवो आनंद हें । घर ये समझिये आपका ॥६४॥
तंव संन्यासी वदे इतुक्यांत । हमारे दोन बच्चे हैं साथ । बहोत अच्छी है ए बात । देव मग म्हणतात तयातें ॥६५॥
होता जेवावया अवकाश । म्हणोनि देव पुसती तयांस । कहां आपका उतारा है खास । जहां मैं तपासकूं भेंजूं ॥६६॥
क्या जरूर कब मैं आवूं । किस घंटे मैं हाजर रहूं । जब बोलोगे तब आता हूं । संन्यासी बोलूं लागला ॥६७॥
अच्छा बच्चे लेके साथ । बारा घंटे होनेके बखत । आवो भोजन पावो संत । ऐसें तंव वदत देव तया ॥६८॥
असो मग ते संन्यासी गेले । बरोबर बारा होतां परतले । जेवावया तिघेही बैसले । भोजनीं धाले यथेष्ट ॥६९॥
होऊनियां पाकनिष्पत्ती । ब्राम्हाणांच्या बैलल्या पंक्ती । सपरिवार संन्यासियाप्रती । तृप्त करिती यजमान ॥७०॥
सवें घेऊनि दोघेजण । आला संन्यासी आपण होऊन । तरी तयाचें पूर्व प्रयोजन । पसरी आवरण मायेचें ॥७१॥
तेणें हा कोणीतरी अतिथी । पावावया भोजनप्राप्ति । आला, इतुकेंच देवांचे चित्तीं । द्दढावली वृत्ति मोहाची ॥७२॥
एणेपरी झालीं भोजनें । उत्तरापोशनें शुद्धाचमनें । सुंगधशीतल पदकप्राशनें । मुखशुद्धिदानें संपादिलीं ॥७३॥
शिष्टाचार गंधसुमनें । तांबूल अत्तर गुलाबदानें । दिधलीं सर्वत्रांप्रति बहुमानें । आनंदानें देवांनीं ॥७४॥
असो मग ऐसिया उपरी । मंडळी गेली घरोघरीं । संन्यासीही निजपरिवारीं । गेले माधारीं निजस्थळीं ॥७५॥
जरी आगंतुक अनिमंत्रित । तरी ते वेळीं येऊनि जेवत । परी देवां न बाबासे वाटत । संशय राहत मनांत ॥७६॥
ऐसें जरी घडलें प्रत्यक्ष । तिघे अयाचित वाढिले समक्ष । तरीही देव मनीं साकांक्ष । जोगांची साक्ष घेतातचि ॥७७॥
असो होतां उद्यापनपूर्ती । देव तंव जोगां पत्र लिहिती । ऐसें कैसें तरी साक्ष पटेल । कैसें न वाटेल हें मजला ॥७९॥
तरी ही ऐसी गत कां झाली । माझीच कां ही निराशा केली । बहुसाक्षेपें वात पाहिली । कांहीं न आली प्रचीती ॥८०॥
प्रेमें बाबांस इमंत्रितां । येतों वदले मज शारणागता । परी तें सर्व झालें अन्यथा । कैसें हें सर्वथा न कळे मज ॥८१॥
माझी य्ण्याची परतंत्रता । अति काकुळती पत्रीं लिहितां । तरीही आपण येणार हें परिसतां । मज बहु धन्यता वाटली ॥८२॥
आतां आपण कवण्याही मिषें । येणार वाटलें कवण्याही वेषें । परी तें कांहीं न घडलें कैसें । आश्चर्य विशेषें वाटतें ॥८३॥
जोगांनीं तें सकल वृत्त । साईचरणीं केलें निवेदित । बाबा होऊनि आश्चर्यचकित । काय तयांप्रत बोलत ॥८४॥
“पत्र उकलतां मजपुढती । पत्रांतर्गत मनोवृत्ती । वाचावयाचे आधींच निश्चिती । उभ्याच ठाकती मूर्तिमंत ॥८५॥”
तो वदे मी माझिया बोलें । विश्वास देऊनि तया फसविलें । सांग तया त्वां मज नोळखिलें । कां मग बोलविलें होतेंस ॥८६॥
लौकिकीं ना येथूनि हाललों । परी मी उद्यापनीं जेवूनि आलों । दोघांसमवेत येईन बोललों । तैसाचि गेलों दोघांसवें ॥८७॥
होत जिवावया अवकाश । तेव्हांच आधीं एकटा सावकाशा । तुज नाठवे का संन्यासवेष । प्रथम प्रवेश ये रीती ॥८८॥
पाहूनि आलों अकल्पित वृत्ति । पैसे मागेन तुज ही भीती । वाटली नव्हती का तव चित्तीं । संशयनिवृत्ती म्यां केली ॥८९॥
येईन केवळ जेवावयास । सवें घेऊनियां दोघांस । ऐसें सांगूनियां वेळेस । नाहीं का दोघांसह जेवलों ॥९०॥
पहा मी माझिया वचनाकारणें । मरोनि जाईन जीवें प्राणें । परी माझिया मुखींचीं वचनें । अन्यथा होणें नाहीं कदा” ॥९१॥
ऐसें वदतां साईनाथा । आनंद नावरे जोगांच्या चित्ता । दिधलें वचन व्हावें न अन्यथा । अनुभव हा सर्वथा सर्वांचा ॥९२॥
पुढें मग हें वृत्त । जोग कळविती देवांप्रत । पत्र एक सविस्तर धाडीत । अतिमुदित मानसें ॥९३॥
देवांनीं जैं पत्र वाचिलें । प्रेमोद्रेकें नेत्र ओथंबले । धिक् धिक् । व्यर्थ साईंस दुषिलें । बहु हिरमुसले मनांत ॥९४॥
धन्य बाबांचें महिमान । धिक् माझ्या जाणिवेचा अभिमान । परी बाबाच संन्यासी हें अनुमान । व्हावें तें कैसें न मज कळे ॥९५॥
कारण बाबांस केलें निमंत्रण । त्या आधींच त्या प्रथमाभिगमन । तेंही तयाच्या कार्यालागून । भेटीस प्रयोजन पट्टीचें ॥९६॥
तया दिधली होती मुदत । दों चार मासां यावें परत । तोच तो जरी भोजन । माझियासंगें येतील दोन । विसरलों मी भान तयाचें ॥९८॥
बाबांचिया आमंत्रणापाठीं । पदती जरी यासी प्रथम गांठी । तीही केवळ जेवणासाठीं । तरीन हे दिठी चाकाटति ॥९९॥
परी तो आला गोरक्षणा निमित्त । मिळवावया गोग्रासवित्त । तयानंतर तें साईंप्रत । आमंत्रण जात उद्यापना ॥१००॥
म्हणोनि ऐसा मोह पडला । तेणें हा ऐसा प्रकार घडला । जरी दोघांसह येऊनि जेवला । तरी तो भासला अन्नार्थी ॥१०१॥
नसतां कोणी पूर्वपरैचित । भॊजनसमयीं येतां अकल्पित । घेऊनि कोणीही दोघे समवेत । साईच ते निश्चित वाटते ॥१०२॥
परी या संतांची ऐसीच रीती अघटित लीला अद्भुत कृती । भक्तांघरींची कार्यस्थिती । स्वयेंचि योजिती त्या आधीं ॥१०३॥
भक्त विनटतां निजचरणीं । तयाचिया शुभकार्याची संपादणी । ऐसीच होते अकल्पितपणीं । अतर्क्य करणी संतांची ॥१०४॥
चिंतिलेंचि दे चिंतामाणी । कल्पवृक्ष दे कल्पिलें मनीं । कामधेनु ते कामप्रसविणी । अचिंत्यदानीं गुरुमाय ॥१०५॥
असो ये ठायीं बाबा निमंत्रित । संन्यासियाच्या रूपें प्रकटत । परी तयांची लीला अघटित । अयाचितही येत कधीं ॥१०६॥
कधीं छायाचित्ररूपें । कधीं पार्थिव मूर्तिस्वरूपें । पार नाहीं तयांच्या कृपे । प्रकटती आपेआप कधीं ॥१०७॥
ये अर्थींचा माझा अनुभव । परिसतां श्रोतयां वाटले नवलाव । कळेल साईलीलाप्रभाव । कथा ही अभिनव अपूर्व ॥१०८॥
ही काकथा कीं ही कहाणी । ऐसेंही ईस वदेल कोणी । म्हणावें तें खुशाल त्यांणीं । परी ये श्रवणीं सादर व्हा ॥१०९॥
आळस निद्रा तंद्रा टाकून । होऊनियां साबधान । कथा ही परिसा द्या हें दान । होईल समाधान मग माझें ॥११०॥
व्यग्रता क्षण झुगारून । स्वस्थचित्त अव्यग्र मन । झालिया काम येईल श्रवण । पुढें मग मनन निजध्यास ॥१११॥
तेथूनि पुढें साक्षात्कार । परी या सर्वां श्रवण आधार । तेंच कीं या सर्वांचें सार । निश्चयें भवपार त्याचेनी ॥११२॥
सन एकोणीसशें सतरा इसवीसी । फाल्गुन शुद्ध पौर्णिमेसी । शेजे निद्रिस्त असतां पहाटेसी । स्वप्न एक मजसी जाहलें ॥११३॥
पहा साईंचें विचेष्टित । सुंदरवेष संन्यासी होत । देऊनि दर्शन मज जागवीत । भोजना मी येत आज वदे ॥११४॥
स्वप्नामाजील जागृतपण । तेंही केवळ स्वप्नचि पूर्ण । कारण जागृत होतां मी आपण । कराया आठवण लागलों ॥११५॥
डोळे उघडूनि पाहूं लागें । नाहीं साई न कोणी ते जागे । स्वप्नचि तें जें क्षणामागें । यक्तिंचित्त जागेपण नव्हतें ॥११६॥
ऐसी होतां मनाची निश्चिती । आठवूं लागलों स्पप्नस्थिति । अक्षरें अक्षर आठवलें चित्तीं । लवमात्र विस्मृतिविरहित ॥११७॥
योतों मी आज भोजनास । या साईंच्या स्पष्टोक्तीस । ऐकूनि आनंदलों जीवास । कळविलें कलत्रास हें वृत्त ॥११८॥
ध्यानीं मनीं मनीं साईंचा ध्यास । हा तों निरंतरचा अभ्यास । सात वर्षांचा जरी सहवास । आस न भास भोजनाचा ॥११९॥
असो तिजला ठेविलें सांगून । आहे आज होळीचा सण । एक टिपरी अधिक आधण । घालाया आठवण ठेवावी ॥१२०॥
हें इतुकेंचि कळवितां तीस । लागली कारण पुसावयास । मी म्हणें आज जेवावयास । पाहुणा या सणास येणार ॥१२१॥
तंव ती म्हणे सांगा कोण । जिज्ञासा तीस जाहली दारूण । परी मीं सांगतां खरें कारण । उपहासा भाजन होणार ॥१२२॥
हेंही मज ठावें पूर्ण । तरीही न व्हावें । सत्यप्रतारण । म्हणोनि श्रद्धापूर्वक जाण । केलें मीं निवेदन सत्यत्वें ॥१२३॥
तरी हें आहे श्रद्धेवरी । जैसी जया जाणीव अंतरीं । वार्ता खोटी अथवा खरी । हें तो मनावरी सर्वथैव ॥१२४॥
कितीही तिची करितां खातरी । वार्ता पटेना तियेचे अंतरीं । ती म्हणे बाबा शिरडीहूनि दुरी । कशासही तरी येतील ॥१२५॥
आपुले येथील काय भोजन । कशाचा आपुला होळीचा सण । टाकूनिया शिरडीचें मिष्टान्न । सेवितील कदन्न का येथें ॥१२६॥
येणेंपरी तिचें भाषण । मी म्हणें एक टिपरीचें आधण । ठेवितां आपणा सायास कोण । टिपरीची वाण नाहीं तुज ॥१२७॥
प्रत्यक्ष येतील साईच पाहुणे । ऐसें तुजला मीही न म्हणें । परी घडेल कोणाचें तरी येणें । हें नि:शंकपणें मज वाटे ॥१२८॥
मग तूं मनीं कैसेंही मान । मी त्या मानीन साईंसमान । किंबहुना प्रत्यक्ष साई न आन । अन्वर्थ स्वप्न होईल मज ॥१२९॥
असो ऐसें जाहलें भाषण । पुढें पातला समय माध्यान्ह । होतां यथाविधि होलिकापूजन । मांडिली भोजनपत्रावली ॥१३०॥
आदिकरूनि पुत्र - पौत्र । दुहिता जामात इष्टमित्र । पंक्ती मांडिल्या सपीठपात्र । घातल्या विचित्र रांगोळ्या ॥१३१॥
त्यांतचि एका मुख्यपंक्ती । पाट मांडिला मध्यवर्ती । पात्र एक साईंप्रती । इतरांसमवेती वाढलें ॥१३२॥
पात्राभोंवती रांगोळी । घातली रंगीबेरंगी निळी । प्रत्येका तांब्या पंचपात्री पळी । सर्वासमेळी समसगट ॥१३३॥
पापड सांडगे कोशिंबिरी । वाढिलीं लोणचीं रायतीं साजिरीं । परोपरीच्या भाज्या खिरी । जाहली तयारी बहुतेक ॥१३४॥
पाहूनियां बारा झाले ॥ जेवणारे सोंवळीं नेसले । येऊनि एकेक पाटीं बैसले । तोंही न आलें कोणी दुजें ॥१३५॥
सर्व पात्रें गेलीं भरोन । वाढिलें भात पोळी वरान्न । रित्या मध्यवर्ती पात्रावांचून । कांहीं न न्य़ून ते जागीं ॥१३६॥
कोणी पाहूणा अथवा अतिथी । येईल म्हणूनि मार्ग लक्षिती । जाहलों मी साशंक चित्तीं । वाट ती किती पहावी ॥१३७॥
म्हणोनि दिधली दारास कडी । अन्नशुद्धि वाढिली तांतडी । वैश्वदेव नैवद्य परवडी । अन्नार्पणघडी पातली ॥१३८॥
आतां घेणार प्राणाहुती । इतुक्यांत जिन्यावर पाउलें वाजती । रावसाहेब कोठें कीं वदती । बैसले बैसती निवांत ॥१३९॥
तंव मी तैसाच गेलों दारीं । वाटलें कोणी आलें अंतरीं । हळून दाराची कडी जों सारीं । दिसले जिन्यावरी दोघेजण ॥१४०॥
त्यांतील एक अल्लीमहमद । दुजे संत मौलाना - शाग्रीद । इस्मू मुजावर नामाभिध । आनंदप्रद दोघेही ॥१४१॥
पानें वाढूनि मंडळी बैसली । भोजनाची तयारी देखिली । पाहोनि अल्लीनें विनंती केली । तसदी मी दिधली क्षमा करा ॥१४२॥
वाटतें आपण जेवणावरून । आलां मजकरितां धांवून । आपणालागीं हात धरून । पंक्तीही खोळंबून राहिली ॥१४३॥
तरी घ्या ही आपुली वस्त । मग मी भेटेन होतां फुरसत । सांगेन नवलाव इत्थंभूत । अत्यद्भुत येविषयींचा ॥१४४॥
ऐसें वदूनि खाकेंतून । अल्ली एक पुडकें काढून । टेबलावर सन्मुख ठेवून । सोडवूं गांठवण लागला ॥१४५॥
काढितां वृत्तपत्राचें वेष्टण । दिसली साईंची मूर्ति तत्क्षण । म्हणे ही ठेवा वस्तु आपण । करा ही विनवण मान्य माझी ॥१४६॥
पाहतां साईंची तसबीर । रोमांच उठले शरीरावर । चरणांवरी ठेविलें शिर । जाहलें अंतर सद्नदित ॥१४७॥
वाटला मोठा चमत्कार । ही साईंची लीला विचित्र । वाटलें मज केलें पवित्र । दावूनि चरित्र हें ऐसें ॥१४८॥
उठली प्रबळ उत्कंठा मनीं । आणिली ही तसबीर कोठुनी । तो म्हणे मीं एका दुकानीं । विकत घेउनी आणिलीसे ॥१४९॥
पुढें मग ते दोघेजण । उभे न राहती एकही क्षण । म्हणाले आतां जातों आपण । करावें भोजन स्वस्थपणें ॥१५०॥
आतांच या गोष्टीचें कारण । कथूं जातां केवळ निष्कारण । खोळंबेल मंडळीचें जेवण । तें मी मग कथीन सावकाश ॥१५१॥
मलाही तें वाटलें समर्पक । तसबीर वेळीं आली हा हरिख । तयांतचि मी जाहलों गर्क । आभारप्रदर्शक उद्नारलों ॥१५२॥
बरें आतां यावें आपण । आम्हीही पुढें करूम निवेदन । तसबीर येथें येण्याचें कारण । आजचि प्रयोजन काय तिंचें ॥१५३॥
असो पुढें ते गेलियापाठीं । यथानिश्चित साईंसाठीं । मध्यवर्ती । मधवर्ती स्थापिल्या पीठीं । नेऊनि ती पाटीं प्रस्थापिली ॥१५४॥
सुखावलें अवघ्यांचें मन । अतर्क्य साईंचें विंदान । एणें मिषें करूनि आगमन । स्वप्नींचें वचन सत्य केलें ॥१५५॥
आलाच तर कोणी अतिथी । येऊनि तेथें बैसेल पंक्तीं । हीच अपेक्षा ज्यांचिये चित्तीं । आश्चर्य किती हें तयां ॥१५६॥
पाहोनि चित्रींची सुंदर मूर्ती । परम आल्हाद सकळांप्रती । कैसें हे घडलें अकल्पित रीतीं । आश्चर्य करिती समस्त ॥१५७॥
ऐसें होतां प्रतिष्ठापन । केलें अर्ध्यपाद्यादि पूजन । भक्तिप्रेमें नैवेद्य समर्पण । अवघीं मग भोजन आरंभिलें ॥१५८॥
तैंपासाव हा काळवर । प्रत्येक होळीस ही तसबीर । करवूनि घेई हे शिष्टाचार । अष्टोपचार पूजेसह ॥१५९॥
इतर पूजेंतील देवांसहित । हीही देव्हारीं पूजिली जात । ऐसें हें साई अपूर्व चरित । भक्तांसी दावीत पदोपदीं ॥१६०॥
असो पुढें हे दोघेजण । आज उद्यां भेटूं म्हणून । वर्षें नऊ गेलीं निघून । तरीही न दर्शन तयांचें ॥१६१॥
कर्मधर्मसंयोगें शेवट । अल्ली महमद याची गांठ । पडली यंदा याहली भेट । सहज मी वाट चालतां ॥१६२॥
भेट होतांचि जाहलों उत्सुक । तसबिरीचें पुसावया कौतुक । का हो इतुकीं वर्षें मूक - । वृत्तीचे सेवक बनलां तुम्ही ॥१६३॥
जैसी पूर्वीं तैसी आज । पडली अवचित गांठी मज । योग आला आहे सहज । सांगा ती मौज समग्र ॥१६४॥
तुम्हीही श्रीसाईंच भक्त । आहे ठावें हें मज समस्त । परी ते दिवसींच कैसे अवचित । यावें हें उचित वाटालें ? ॥१६५॥
मग तो अल्ली वदे वृत्तांत । परिसा म्हणे कथितों साद्यंत । पहा साईंची लीला अत्यद्भुत । आश्चर्यभरित ती सर्व ॥१६६॥
या लीलेचा काय अर्थ । काय यांतील निजकार्यार्थ । यांत भक्तांचें काय इगित । साईच सुसंगत जाणता ॥१६७॥
आपण केवळ एकमेकांनीं । परिसाव्या या लीला कानीं । किंवा त्या गाव्या निजमुखांनीं । नि:श्रेयसदानी म्हणवोनि ॥१६८॥
असो आतां पुढील भाग । पुढील अध्यायीं कथूं सांग । आनंद पावेल श्रोतृसंघ । चरित्र अमोघ साईंचें ॥१६९॥
साई निर्द्वेष आनंदघन । सदा भजावा अनवच्छिन्न । पावाल निजसुख - समाधान । मन निर्वासन होईल ॥१७०॥
चातक निजस्वार्था विनवी । मेघ सकळ सृष्टीतें निववी । बाळासाहेब बाबांस बोलवी । बाबा तंव पालवीत भक्तांसवें ॥१७१॥
भक्तपंक्ती श्रोतेही बैसती । प्रेमें उद्यापनकथा परिसती । साईसमागम - आनंद भोगती । ढेंकरही देती तृप्तीचे ॥१७२॥
अनाहुतही कैसे येती । कैसे पार्थिवस्वरूपें प्रकटती । कैसे निजदासां आभारी करिती । कैसे ते जागविती पदोपदीं ॥१७३॥
असो हेमाड साईंसी शरण । पुढील कथेची हीचि मांडण । मांडील घेईल करूनि निरूपण । आपुली आपण यथेष्ट ॥१७४॥
शरणागता घालितो पाठीं । याच त्याचिया ब्रीदासाठीं । हेमाड घाली पायीं मिठी । परता न लोटी तो तया ॥१७५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । उद्यापनकथाकथनं नाम चत्वारिंशत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥