साईबाबांच्या 7 अद्भुत मुरत्या

साई बाबा यांचे पहिले मंदिर त्यांचे भक्त केशव रामचंद्र प्रधान यांनी निर्मित केले होते. त्यांचे दुसरे मंदिर शिरडीत आहे जिथे त्यांनी समाधी घेतली होती. बाबांचे तिसरे मंदिर महाराष्ट्रच्या परभणी जिल्ह्यात पाथरी गावात आहे जिथे बाबांचा जन्म झाला होता. आज देशभरात बाबांचे अनेक मंदिर आहेत ज्यातून काही मंदिरात बाबांच्या मुरत्या पाहून मन भरून येतं.


पुढील पानावर साईबाबांची मूर्ती नंबर 1

साईबाबा मूर्ती नंबर 1
साई मंदिर, शिरडी जिल्हा अहमदनगर (महाराष्ट्र)
उंची 5.5 फुट
 
‍साईबाबांने जिथे समाधी घेतली तिथे त्यांची मोठी मूर्ती निर्माण करण्यात आली. साई भक्तांसाठी शिरडी हे तीर्थ स्थळ आहे जिथे विश्वभरातून लोकं समाधीवर डोकं टेकून दर्शन घेतात. साईंच्या समाधी स्थळावर या मूर्तीचे अनावरण बाबांच्या 36 व्या पुण्यतिथी अर्थात 7 ऑक्टोबर 1954 मध्ये केले होते.
शिरडीत नेहमीच भक्तांची गर्दी असते. दररोज तिथे सुमारे 30 हजार भक्त बाबांचे दर्शन घेतात, तसेच गुरुवारी आणि रविवारी ही संख्या दुप्पट होते.


पुढील पानावर साईबाबांची मूर्ती नंबर 2 

साई बाबा मूर्ती नंबर 2
श्रीसाई महाराज देवालयम, मछलीपट्टणम, जिल्हा कृष्णानगरम (आंध्रप्रदेश)
उंची 54 फुट आणि रुंदी 36 फुट
 
श्रीसाईबाबांची ही विशाल मूर्ती आंध्रप्रदेशातील मछलीपट्टणमच्या मधोमध स्थित जिल्हा कोर्टाच्या समोर आहे. याचे अनावरण 2011 मध्ये झाले होते.
विजयवाडाहून 60 किलोमीटर दूर मछलीपट्टणमचा मागिनापुडी समुद्र किनारा खूप शांत आणि स्वच्छ आहे. येथील पोहचण्याचा रस्ता रम्य असून गावातील सुंदर झोपड्या, डाळ आणि तांदुळाचे शेत, उंच नारळाचे झाडे,  रस्त्याच्या बाजूने वाहणारे कालवे यात मन रमून जातं.


पुढील पानावर साईबाबांची मूर्ती नंबर 3

साईबाबा मूर्ती नंबर 3
रेपुर गांव, काकीनाडा जवळ, ईस्ट गोदावरी जिल्हा (आंध्रप्रदेश)
उंची 116 फुट
 
आंध्रप्रदेशातील पूर्वी गोदावरी जिल्ह्यात काकीनाडाजवळ रेपुर येथे साईबाबांची सर्वात मोठी मूर्ती आहे. याचे अनावरण 2012 मध्ये झाले होते.
बसलेल्या  मुद्रेत असलेल्या या मूर्तीच्या दर्शनासाठी भक्त लांबलांबून येथे येतात. येथे बाबांच्या पादुकाही ठेवण्यात आल्या आहे.
 

पुढील पानावर साईबाबांची मूर्ती नंबर 4

साईबाबा मूर्ती नंबर 4
साईबाबा मूर्ती, सूरत (गुजरात)
उंची 14 फुट 
 
गुजराताच्या सूरत शहरात मक्काई पूल चौरस्त्यावर स्थित साईबाबांची ही मूर्ती अद्भुत मुद्रेत आहे.


पुढील पानावर साईबाबांची मूर्ती नंबर 5

साईबाबा मूर्ती नंबर 5
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज मंदिर, भिवपुरी, तहसील करजत जिल्हा रायगड (महाराष्ट्र)
उंची सामान्य
 
साईबाबांचे एक भक्त केशव रामचंद्र प्रधान यांनी भिवपुरीत 1916 साली हे मंदिर निर्माण केले होते. हे मंदिर मुंबई ते पुणे मार्गावरील आहे. 


पुढील पानावर साईबाबांची मूर्ती नंबर 6

साईबाबा मूर्ती नंबर 6
साईनाथ जन्मस्थान मंदिर, पाथरी जिल्हा परभणी (महाराष्ट्र)
उंची सामान्य
 
महाराष्ट्रच्या पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 सप्टेंबर 1830 रोजी झाला होता. मंदिरात साईंची आकर्षक मूर्ती असून हे बाबांचे निवास स्थळ आहे जिथे जुन्या वस्तू जसे भांडी, घट्टी ठेवलेली आहेत.

 

पुढील पानावर साईबाबांची मूर्ती नंबर 7

साईबाबा मूर्ती नंबर 7
जिल्हा हरदा (मध्यप्रदेश)
उंची सामान्य 

मध्यप्रदेशातील हरदा येथे एका साई भक्त कुटुंबाकडे शंभर वर्षांपूर्वी शिरडीच्या साई बाबांने स्वत:च्या हाताने दिलेल्या त्यांच्या चरण पादुका आहे. बाबांचे भक्त रामकृष्ण परुलकर ऊर्फ छुट्ट भैया यांना स्वत: साईंने या पादुका 1915 साली दिल्या होत्या. आता रामकृष्ण नसले तरी त्यांचे कुटुंब प्रमुख किशोर रंगनाथ परुलकर आणि राधा किशोर पुरुलकर या पादुकांची पूजा करतात.

या कुटुंबाच्या पूर्वजांचे फोटो आजही शिरडीत येथे लागले आहे. येथे साई बाबांची लहानसी मूर्ती आहे जिथे शिरडी मंदिराप्रमाणेच दररोज साई पूजा आणि आरती होते. 
 
सौजन्य: सर्व चित्र यूट्यूब व फेसबुक हून साभार

वेबदुनिया वर वाचा