भारतीय क्रीडा क्षेत्रात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरला आहे. स्पोटर्स इलस्ट्रेटेडने तयार केलेल्या 50 भारतीय प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सचिन पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमांकावर आयपीएल अध्यक्ष ललीत मोदी असून तिसर्या क्रमांकावर फोर्स इंडियाचे मालक विजय माल्या आहेत.
स्पोटर्स इलस्ट्रेटेडने तयार केलेल्या यादीत आयसीसीचे भावी अध्यक्ष शरद पवार चौथ्या क्रमांकावर असून टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पाचव्या स्थानावर आहे. बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांना सहावे स्थान मिळाले आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींचा लवकरच सत्कार केला जाणार आहे.