भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसापूर्वी वानखेडे स्टेडियमवर एक विशेष कार्यक्रम पार पडला आहे.
वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआयचे सजिव जय शाह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार देखील उपस्थित होते.