सामनावीर पुरस्काराचाही सचिनचा विक्रम

सचिन आणि विक्रम हे समीकरण इतके प्रचलित झाले आहे की सचिनची प्रत्येक खेळी नवनवीन विक्रम घेवून येते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर आणि मालिका‍वीर पुरस्कार पटकविण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरने अबाधीत ठेवला आहे.

सचिनचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 16,895 धावा झाल्या असून 59 वेळा सामनावीर पुरस्कार पटकविला आहे. तसेच 14 वेळा मालिकावीर ठरला आहे. सचिननंतर जयसूर्या दुसर्‍या स्‍थानावर असून त्याने 48 वेळा सामनावीर तर 11 वेळा मालिकावीर पुरस्कार घेतला आहे. परंतु कसोटीमध्ये 12 वेळाच सचिनला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. तो सर्वाधिक पुरस्कार घेणार्‍यांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आहे.

वेबदुनिया वर वाचा