चुंबक
प्रसिद्ध गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी चुंबकमध्ये प्रभावी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले. साहिल जाधव आणि संग्राम देसाई या दोघांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. संदीप मोदींनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला बॉलीवूडच्या सुपरस्टार अक्षय कुमार यांनी प्रस्तुत केले होते. चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया आणि नरेन कुमार यांनी केली होती.
गुलाबजाम
या चित्रपटाने प्रेक्षकांची गोड भूक भागवली. सुखदु:खांच्या आठवणी आणि त्याच्या आंदोलनात आयुष्य असते हा सोपा आणि सुंदर आशय अत्यंत तरलपणाने सचिन कुंडलकर यांनी गुलाबजाम या चित्रपटातून आणला आहे. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिकेने सजलेली गुलाबजामाची चव प्रेक्षकांना आवडली.
मुळशी पॅटर्न
राज्यभरात 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाने धुमाकूळ घातला. पुण्यातील मुळशी परिसरातील गुन्हेगारी विश्वावर आधारित हा सिनेमा आपल्या विषयामुळे खूप गाजला. प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित या सिनेमात मोहन जोशी, महेश मांजरेकर, स्वत: प्रवीण तरडे, ओम भुतकर, क्षितिश दाते, उपेंद्र लिमये, सुरेश विश्वकर्मा यांनी प्रमुख भूमिका गावल्या होत्या.
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
डॉ. घाणेकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित या चित्रपटात सुबोध भावे यांनी आजच्या पिढीसाठी त्यांना जिवंत केले. प्रसाद ओक, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी यांनी त्या काळातील प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, सुलोचना, भालजी पेंढारकर आदींच्या व्यक्तिरेखाही नीट रेखाटल्या आणि नाट्यप्रेमी कलावंताच्या जीवनाला चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न के ला.