वर्ष 2017 चे लोकप्रिय फोन, ज्यांनी बाजारात धूम केली

शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (12:03 IST)
मोबाइल वर्ल्डमध्ये सतत नवीन मॉडल्स येत असतात. नवीन नवीन फीचर्ससोबत रोज नवीन मोबाईल लाँच होत आहे. काही महिन्यातच मोबाइल जुने होऊन जातात. एक नवीन फीचर जुना होऊन जातो. रिसर्च फर्म आईएचएसने 2017तील जगभरातील सर्वात लोकप्रिय स्मार्ट फोनची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. तर जाणून घेऊ कोणते आहे हे स्मार्ट फोन.

आयफोन 7
ऍपल आयफोनचा मोबाइल जगतात एक वेगळाच स्थान आहे. 2017 मध्ये लाँच झालेला आयफोन 7 मागील 6 महिन्यातील सर्वात लोकप्रिय फोन आहे. याचे मुख्य कारण असे आहे की हा भारताच्या तुलनेत इतर देशांमध्ये स्वस्त आहे.
आयफोन 7 प्लस
आयफोन 7 प्लसची सर्वात मोठी बाब अशी आहे की यात 12 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा आहे. किमान 60,000ची किंमत असणार्‍या या फोनच्या कॅमेर्‍यातून तुम्ही पोट्रेट मोडमध्ये उत्तम प्रकारे फोटो घेऊ शकता.  
गॅलॅक्सी ग्रँड प्राइम प्लस
सॅमसंगचा हा फोन या लिस्टचा एकुलता बजेटमध्ये असणारा फोन आहे. गॅलॅक्सी जे2 च्या नावाने ओळखण्यात आलेला ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा आणि 2600 एमएचची बॅटरी आहे.
आयफोन 6एस
ऍपलचा हा फोन 2017तील सर्वात जास्त विक्री होणारा फोन आहे. 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि 4k व्हिडिओ रिकॉर्डिंगची सुविधा असणार्‍या या फोनची किंमत 30,000 ते 40,000ची असल्यामुळे लोकांमध्ये फारच लोकप्रिय आहे.
गॅलेक्सी एस 8
ज्या लोकांची पहिली पसंत ऍपल नसून एंड्राइड आहे, पण त्यांना सर्वात हायप्रोफाइल फोन खरेदी करायची आहे तर त्यांची पहिली पसंत सॅमसंग एस 8 आहे. एप्रिलमध्ये विक्री सुरू झाल्यानंतर किमान 53,000च्या फोनने बाजारात धूम केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती