कोपर्डी प्रकरण : गुन्हेगारांना झाली अखेर फाशीची शिक्षा

शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (11:55 IST)
२०१७ वर्ष हे खऱ्या अर्थाने वादळी ठरले ते कोपर्डी प्रकरण आणि त्यावर झालेली न्यायलयीन सुनावणी न्यायलयाने न्याय करत सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सर्व समाजात स्तरातून याचे स्वागत झाले आणि या प्रकरणात जीव गमवलेल्या बघिनीला थोड्या प्रमाणत का होईना न्याय मिळाला आहे.
 
मात्र हे प्रकरण काय होते ? काय झाले या वर्षात सविस्तर :
कोपर्डीत गेलो सगळी घटना कळली. दिनांक १३ जुलैच्या संध्याकाळी ७:३० वाजता आपल्या सायकलीवर ३०० मीटरच्या अंतरावर असलेल्या आज्जी-आजोबाच्या घरी काही मसाल्याच सामान आणायला गेली होती ती...त्यांच्या घरापासून २०० मीटरच्या अंतरावर आरोपींचे घरे होती.
 
मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने नवीन गाडी घेतल्याची पार्टी मित्राला देत होता. ते मुलीच्या आजोबाच्या घरा शेजारील शेतात दारू पीत होते. त्यांनी या मुलीला सायकलीवर जाताना पाहिले आणि ते तात्काळ तिला सामोरे गेले व बाजूच्या शेतात अतिप्रसंग केला.तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिचे हाल-हाल करून हत्या करण्यात आली. तिच्या तोंडात ३ रुमाल लाकडाने कोंबले. तिच्या शरीरातील प्रत्येक भागाचा दाताने लचके काढले. अमानवी कृत्य करण्यामागचा हेतू काय होता ते कळू शकल नाही.
 
हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी त्या शरीराला (जीवित अथवा मृत) तेथून अंदाजे १५० मीटर दूर असणाऱ्या विहिरीत टाकण्यासाठी नेत होते. परंतु लगतच्या साध्या व छोट्या रस्त्यावरून गाडीवर जात असलेल्या तिच्या मावस भावाला रस्त्यावर मुलीची सायकल व लगतच्या बांधावर काही प्रकार दिसला. तो तिकड गेला असता आरोपी पळाले....मावस भावाला अनपेक्षित प्रकार दिसला.
 
त्या नंतर तिची body(जिवीत अथवा मृत) कर्जत येथे hospital नेली असता तिथ डॉक्टरांनी मृत घोषीत केल.
 
फाशीची शिक्षा
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले. गेल्या आठवड्यात या खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने या तिघांचा गुन्हा आणि स्वरूप पाहता तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली आहे. यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले आहे. खटल्यात सरकारी पक्षाकडून ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. यात मृत मुलीची मैत्रिण, आई, बहिण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपासी अधिकारी, पंच साक्षीदार असे महत्वाचे साक्षीदार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती