सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कुडाळ तालुक्यातील माणगाव क्षेत्राला अधत्यामाची मोठी परंपरा लाभली आहे. हे गाव म्हणजे परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांचे जन्मगाव आहे. येथील ग्रामदेवता श्री देवी यक्षिणी ही आहे. एके काळी या गावात वेताळ, ब्रह्मसंमंध, भूतखेत इत्यादींच्या उपद्रवामुळे मनुष्यवस्ती टिकत नव्हती. तापाची साथ आली की, अनेक लोक मृत्यूमुखी पडत होते. या कारणामुळे येथील लोकवस्ती विरळ होत चालली होती.
या श्री देवी यक्षिणीमुळे माणगावातील भुतांचा उपद्रव आणि साथींचे रोग हे शून्यावर आले. स्वामी महाराजांना दत्तप्रभूंचे अवतार मानतात. श्री क्षेत्र दत्तमंदिर 1805 साली स्थापन झाले. म्हणून माणगावला प्रती गाणगापूर असं म्हणतात. माणगाव येथील कर्ली नदीला टेंबेस्वामी यांनी निर्मला असे नाव ठेवले. माणगाव गावाला तालुक्याचा दर्जा मिळाला असून येथील शैक्षणिक, वैद्यकीय आदी सुविधा तसेच आऊट पोस्ट, पोस्ट ऑफिस, दूरध्वनी केंद्र अशा सोयी असलेल्या गावाने कृषी क्षेत्रातही लक्षणीय प्रगती केली आहे.
येथे ग्रामपंचायतीची स्थापना 1956 साली झाली. येथील लोकसंख्या अंदाजे 7100 इतकी आहे. या गावाचे क्षेत्रफळ 1952 हेक्टर इतके आहे. येथील श्री देवी यक्षिणीचे मूळ स्वरूप महालक्ष्मीचे आहे. अनेक पर्यटक या क्षेत्राला भेट देऊ लागले आहेत.