16 व्या शतकात कर्नाटकाच्या हम्पी येथे निर्मित विठ्ठल मंदिराचे संगीत स्तंभांचा गूढ अजून कायमच आहे. या मंदिरात 56 खांब आहे, ज्याने हात लावल्याने संगीत ऐकू येतं. तुंगभद्रेच्या काठावर वसलेले हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण मंदिरातील खांब पोकळ नसून त्यातून आजही 'सरगम'चा निनाद ऐकण्यात येतो.
या मंदिराचे बांधकाम राजा कृष्णदेवराय द्वितीय यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाले. द्रविडी शैलीतील बांधकाम असलेल्या या मंदिराच्या आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत. मंदिरात एकामागे एक रथ पीठ, ध्वज पीठ, ज्योती पीठ, डाली पीठ आणि तुळशी वृंदावन आहेत. अशी आख्यायिका आहे की येथील दगडी रथात गरूड प्रभू विष्णूला वंदन करायला जातात. मंदिराच्या चारी बाजूंना असलेल्या मंडपात विष्णूचे अवतार कोरलेले आहेत.